जबरदस्तीने धर्मांतराच्या विरोधात मुस्लीम राष्ट्रीय मंच आक्रमक भूमिका घेणार – अली दारूवाला

ali daruwala

पुणे : जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरास मुस्लीम राष्ट्रीय मंचचा विरोध असून धर्मांतराच्या विरोधात यापुढे आक्रमक भूमिका घेतली जाणार आहे. धर्मांतराला पाठिंबा देणाऱ्या संघटनांना मिळणाऱ्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय मुस्लीम मंचाचे राज्य अध्यक्ष अली दारूवाला यांनी पत्रकार परिषदेत केले .

उत्तर प्रदेशातील मौलाना कलीम सिद्दिकी यांच्या अटके नंतर पुण्यातील 22 संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (बुधवारी ) निदर्शने करण्याचा मनोदय जाहीर केला होता. या सर्व हालचालींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंच ने निषेध केला आहे.

कोणत्याही परिस्थिती मध्ये जबरदस्तीने धर्मांतर करण्याची भूमिका आम्ही मान्य करणार नाही, असे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे प्रदेशाध्यक्ष अली दारूवाला यांनी सांगितले .त्यांनी या प्रकरणी निदर्शने करण्यासाठी परवानगी मागितली असताना ती मिळाली नाही .त्या मुळे पत्रकार परिषदेत पुढील भूमिका स्पष्ट करण्यात आली.

कोंढव्यात शाहीन बाग निदर्शने, राज्यातील शेतकरी निदर्शना मागे याच २२ संघटना आहेत. उत्तर प्रदेशातील संघटना त्या मदरसाशी संबंधित आहेत. जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या कामात आहेत. आपल्या लोकशाही देशात जबरदस्तीने धर्मांतरावर बंदी आहे. तरीही नियोजनपूर्वक धर्मांतर होताना दिसते. या मागे पैशाचा गैरवापर आहे. महाराष्ट्र, पुणे आणि कोंढव्यातील संघटनांचा वापर केला जात असल्याचा आरोप दारुवाला यांनी केला.

या संघटनांना मिळणाऱ्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी अली दारुवाला यांनी केली. त्यातून अनेक गोष्टी बाहेर येतील, असेही दारुवाला यांनी सांगीतले.

हे वाचलंत का ? 

Previous Post
pramod choudhari

जैवतंत्रज्ञानाच्या भविष्यातील वापराचे नियोजन शेतकरी केंद्रस्थानी ठेवून केले पाहिजे – डॉ प्रमोद चौधरी

Next Post
jayant patil

‘देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंग देश सोडून पळाले, अशांवर केंद्रीय एजन्सीने का विश्वास ठेवावा’ 

Related Posts
RCB vs DC: अंतिम सामन्यात दिल्ली आणि आरसीबी यांच्यात होणार सामना, पाहा प्लेइंग 11 कशी असेल?

RCB vs DC: अंतिम सामन्यात दिल्ली आणि आरसीबी यांच्यात होणार सामना, पाहा प्लेइंग 11 कशी असेल?

WPL Final, RCB vs DC: महिला प्रीमियर लीगचा दुसरा सीझन शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी (17 मार्च) या…
Read More

औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरकडे नेत असताना देशातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यासाठीची उत्तम शैक्षणिक…
Read More
salman khan

सलमानच्या घरी धमकीचं पत्र कुणी पाठवलं? समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

पुणे – अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) याला धमकी देणारे एक पत्र समोर आल्याने एकच खळबळ उडाली…
Read More