उद्धवजी… घाबरु नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आपल्या मुंबईमध्ये शिवसेनाच येणार – चंद्रभागा शिंदे 

 मुंबई – शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवल्यावर साधी विचारपूस देखील न करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल  शिवसेनेच्या फायर आज्जी ( Mumbai Shivsainik Aaji ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 80 वर्षाच्या चंद्रभागा शिंदे ( Chandrabhaga Shinde ) यांना भेटण्यासाठी  गेले होते. मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह परळ येथील दाभोळकर वाडी येथे आले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे(Rashmi Thackeray) , मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray)  आणि तेजस ठाकरे  होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी फायर आजीसाठी हापूस आंब्याच्या चार पेट्या आणलेल्या होत्या. यावेळी आदित्य ठाकरे आणि तेजस यांनी आज्जीचा आशीर्वाद घेतला. यासोबतच ठाकरे कुटुंबीय आणि चंद्रभागा शिंदे यांच्यासोबत फोटो काढला. आजी भर उन्हात शिवसैनिकांसोबत ‘मातोश्री’बाहेर उभ्या राहिल्या होत्या.

या आजींची शिवसेनेप्रती असणारं प्रेम आणि निष्ठा पाहून राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही (CM Uddhav Thackeray) भारावले. यावेळी तुम्ही  घाबरु नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, साहेब गेले तरी आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेच. आपल्या मुंबईमध्ये शिवसेनाच येणार. असं या आजीबाईनी सांगितले.