Chhagan Bhujbal: याद राख, माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न परत करू नको ; भुजबळांचा जरांगेंना निर्वाणीचा इशारा

Chagan Bhujbal speech in jalana : राष्ट्रवादीचे फायरब्रांड नेते छगन भुजबळ ( Chagan Bhujbal ) यांच्या नेतृत्वात जालन्यातल्या अंबडमध्ये शुक्रवारी ओबीसी एल्गार महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्यावर टीका केली आहे.

आमची लेकरंबाळं, आमची लेकरंबाळं. मग बाकीच्यांची लेकरंबाळं नाहीत का? भुजबळ २ वर्ष बेसन भाकर खाऊन आला तुरुंगात, हो आलो. अरे छगन भुजबळ दिवाळीतही बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो. पण स्व: कष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही”,असा घणाघात भुजबळांनी केला.

दरम्यान, याद राख,  माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न परत करू नको, असा इशारा देत भुजबळ यांनी जरांगे यांचा एकेरी उल्लेख केला. ‘मराठा कुणबी’ आणि ‘कुणबी मराठा’ प्रमाणपत्रांची संख्या आणि त्या अनुषंगाने प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केले. स्व. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९६८ मध्ये ओबीसींना आरक्षण मिळालेले आहे. त्यानंतर बी. पी. मंडल व त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभर फिरून तयार केलेला अहवाल तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी स्वीकारून ५४ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ओबीसींशिवाय इतरांना आरक्षण देण्याची मुभाच नव्हती. परंतु सध्या जे मराठा दैवत निर्माण झाले आहे ते धनगर, माळी, तेली यांना आरक्षणात मध्येच घुसवल्याचे सांगतात, असे मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख टाळून भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-