शाईफेक प्रकरण : 11 पोलिसांचं निलंबन, एका पत्रकारालाही पोलिसांनी केली अटक

Pune – महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काल (शनिवारी) पिंपरीमध्ये शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घटनास्थळावरुनच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांमध्ये मनोज घरबडे आणि त्याच्या दोन साथीदारांचा समावेश होता. विजय ओव्हाळ आणि धनंजय ईचगज यांचाही शाईफेक करण्यात सहभाग होता. या तिघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक प्रकरणी 11 पोलिसांचे निलंबन (Police Suspended) करण्यात आलं आहे. यामध्ये आठ पोलीस कर्माचरी तर तीन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.याप्रकरणी कोणत्याही पोलिसांवर कारवाई करु नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यानंतही पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणात आता एका पत्रकारालाही अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या दोन व्यक्तींसोबत हा पत्रकारही सहभागी झाला होता. ठरवून शाई फेकीचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.