लोकशाही मार्गाने सत्ता येणार नसल्याने हुकुमशाही पद्धतीचा केंद्र सरकारकडून वापर – महेश तपासे

Mahesh Tapase: राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची (India Allaince) बैठक आज बोलविण्यात आलेली आहे. समन्वय समितीची ही बैठक संध्याकाळी चार वाजता बैठक होणार आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी सदस्यांमध्ये काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल, डीएमके नेते टीआर बालू, जेएमएम नेते हेमंत सोरेन, शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते संजय राऊत, आरजेडी नेते तेजस्वी यांचा समावेश आहे. यादव, आप नेते राघव चढ्ढा, समाजवादी पक्षाचे नेते जावेद अली खान, जेडीयू नेते लालन सिंह, सीपीआय नेते डी राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी आणि सीपीआय-एमचा एक सदस्य इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत असेही महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी सांगितले आहे

यावर सविस्तर बोलताना तपासे म्हणाले की केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर यादरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. या अधिवेशनाचा तपशील अद्यापही देशाच्या सरकारने जनतेसमोर मांडलेला नाही आहे. वन इलेक्शन वन नेशन, देशातील सरकार बरखास्त करून नवीन इलेक्शन घेण्याचा अजेंडा आहे का? राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका आहे का? असा कुठलाच अजेंठा सरकारच्या माध्यमातून जनतेसमोर येत नाही आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बोलवले अधिवेशन कोणत्या कारणासाठी बोलवण्यात आलेले आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे. त्या उलट पारंपरिक गणवेश असलेला गणवेश बदलून त्यावर कमळ चिन्ह छापण्यात आले आहे त्यामुळे आम्हीच सर्व आहे असं दाखवण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून करण्यात येत आहे. याला हानून पाडण्यासाठी इंडिया आघाडी कडून रणनीती आखण्यात आली आहे असे देखील महेश तपासे यांनी म्हटले आहे.

महेश तपासे पुढे म्हणाले की, गणवेशात कमळ आणले आहे. असेलेल्या सगळ्या गोष्टी मोडीत काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गोरगरीब महिला यांच्या बद्दल अनेक प्रश्न आहेत कुठे तरी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. देशपातळीवर परिवर्तन करण्याचा अजेंठा या बैठकीत ठरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लोकांचा विश्वास नाही. तरी देखील फॅक्टर मॅंडेट आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. केंद्र सरकारला आगामी निवडणुकीत लोकशाही मार्गाने नाही निवडून येण्याची शक्यता नसल्याने हुकूमशाहीने सरकार आणायचे असा त्याचा विचार आहे. असा हल्लाबोल देखील यावेळी तपासे यांनी केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दोघेही इतके असंवेदनशील असतील असेल वाटले नव्हतें. किळसवांना प्रकार आहे. धनगर आरक्षण देऊ म्हटले होते. तुम्ही ६५ टक्यावर का नेत नाही? तुम्ही पाच दिवसाच्या विशेष अधिवेशनांच संवेदनशीलता गमावलेले हे सरकार आहे. मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री असंवेदनशील आहे. दुर्देवाने दादांचा त्यात समावेश झाला आहे. असेही राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी स्पष्ट केले आहे.

https://youtube.com/shorts/Tn13poRRNl4?si=Fnp7msXQ_47fDZ0H

महत्त्वाच्या बातम्या-

Ajit Pawar गटाला ट्विटरचा मोठा दणका, Sharad Pawar गटाने तक्रार केली होती

भारतीय संघाच्या नावावर लज्जास्पद विक्रम, श्रीलंकेविरोधात जिंकूनही टीम इंडियाचा झाला अपमान!

दोन बिस्किटे दिल्यावर चावणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव; भाजप नेत्याने दिली जुन्या वक्तव्याची आठवण करून