जय शाह यांनी केले राहुल द्रविड यांचे कौतुक; म्हणाले त्यांचे मार्गदर्शन…

Indian Cricket Team Head Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राहुल द्रविडची (Rahul Dravid) पुन्हा एकदा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर त्याचा करार संपला होता . आता बीसीसीआयने त्याचा करार वाढवला आहे.

राहुल द्रविड यांनी गेली 20 वर्ष भारतीय क्रिकेट संघासोबत एक खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून प्रवास केला. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2022 टी 20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. त्याशिवाय 2021-23 चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनलही गाठली. तसेच 2023 विश्वचषक फायनलही गाठली होती. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने लागोपाठ 10 सामन्यात विजय मिळवला होता.

BCCI च्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले आहे की, नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतरचा करार संपल्यानंतर बीसीसीआयने श्री राहुल द्रविड यांच्याशी अर्थपूर्ण चर्चा केली आणि सर्वांच्या संमतीने करार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

जय शाह यांनी केले राहुल द्रविड यांचे कौतुक

भारतीय संघाचा कोच म्हणून राहुल द्रविडपेक्षा चांगला कुणीही नाही, असे मी आधीच सांगितले होते. द्रविडने स्वतःला पुन्हा सिद्ध केले आहे. टीम इंडिया आता एक मजबूत युनिट आहे आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघ टॉपवर आहे. राहुल द्रविड यांचं मार्गदर्शन आणि संघासाठी तयार केलेला रोडमॅपवरुन ते दिसतेय. अंतिम सामन्यापूर्वी सलग 10 सामने जिंकल्यामुळे, आपली विश्वचषक मोहीम काही विलक्षणापेक्षा कमी नव्हती. संघाच्या भरभराटीसाठी योग्य व्यासपीठ तयार केल्याबद्दल राहुल द्रविड कौतुकास पात्र आहे. त्यांना पूर्ण पाठिंबा असेल, असे जय शाह म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-