Pakistan | पाकिस्तानात प्रचंड राजकीय अस्थिरता; सरकार स्थापनेबद्दल निर्माण झाला पेच

Pakistan Elections: पाकिस्तान (Pakistan) तहरीक-ए-इन्साफ अर्थात पीटीआय या पक्षाचे संस्थापक आणि सध्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षांसोबत आघाडी सरकार स्थापन करण्याची कल्पना फेटाळून लावली आहे.

रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात पत्रकारांशी संवाद साधताना, इमरान खान यांनी पीएमएल-एन, पीपीपी आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) हे पैशांचा काळाबाजार करणारे सर्वात मोठे पक्ष असल्याची टीका करत त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे युती करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं.

इमरान खान यांच्या पीटीआय पक्ष प्रणित उमेदवारांनी संसदेच्या 264 पैकी 95 जागा मिळवल्या आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पी एम एल-एन पक्षानं 75 तर माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 54 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसल्यानं पाकिस्तानात (Pakistan) सरकार स्थापनेबद्दल पेच निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!