महाराष्ट्राच्या अडचणी, पाण्याचे प्रश्न, अंगणवाडी सेविकांचा मुद्दा, सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे शिर्डी येथे ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला ३ जानेवारी पासून सुरुवात झाली होती. आज या शिबिराच्या अंतिम दिवशी या शिबिराला संबोधित करतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, मी अजित पवार यांच्या विरोधात बोलावं, असं अनेकाना वाटतं. पण, मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही. जो गरीब आहे, लाचार आहे, त्याच्यासी आपल्याला लढायचं नाही. तर आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या लोकांशी आपली लढाई आहे. दिल्लीत बसलेल्यांशी आपल्याला संघर्ष करायचा आहे. आपली लढाई यांच्याशी नाहीच आहे. कारण, दिल्लीने डोळे वटारले के ते घाबरतात असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्यावर ईडी, सीबीआय नसल्यामुळं मला दादांसारखी दिल्लेश्वरांची भीती वाटत नाही. मेरी इनानदारी मेरी ताकद आहे, असं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. स्वत:च्या कर्तृत्वावर आमच्या आजी तेव्हा पुणे बोर्डावर निवडणून आल्या होत्या. तेव्हा त्यांच्यामागे कुठला राजकीय वारसा नव्हता. तसंच ३८ व्या वर्षी स्वत:च्या हिमतीवर शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी त्यांच्यामागे माझ्या आणि अजितदादांसारखी घराणेशाही नव्हती असे सुप्रिया सुळे म्हणाल.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यशवंताराव चव्हाण यांची भूमिका भाजपला आणि आरएसएसला पुरक नव्हती. त्यांचं आणि आरएसएसकधी जमलं नाही. मात्र, आज यशवंतराव चव्हाणाचा आदर्श सांगणारे भाजपच्या वळचणीला गेले आहे.

आज देशात दडपशाहीचे वातावरण- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

पुढील काळात अनेक गोष्टी होणार आहेत. प्रचंड भपकेबाजपणा समोरच्या बाजूला दिसणार आहे. त्यांचं सरकार असल्यामुळे सरकारचं व्यासपीठ हे पक्षाचं व्यासपीठ असं समजून ते देशात राज्यात वागताहेत पण त्यांच्या भपकेबाजीला घाबरु नका कारण सत्ता असते तेव्हा असा फुकवटा असतो असे शिबिराच्या अंतिम दिवशी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, तसेच हा फुकवटा त्यांच्या विजयासाठी नाहीतर कोण निवडून येणार आहे त्याचा अंदाज घेण्यासाठी असतो, त्यामुळे आपण ठामपणे निर्णय घेऊन काम करणं सुरु केलं पाहिजे. सध्या दडपशाहीचं वातावरण असून संसदरत्नांवर कारवाई झाली आहे. संसदेच्या सुरक्षेप्रकरणी आवाज उठवल्याने देशातले १४३ खासदरांना सत्ताधाऱ्यांनी घरी पाठवलं आहे. सुरक्षेच्या प्रश्नावरुन चर्चेची मागणी केली हा त्यांचा गुन्हा काय? चर्चा होऊ द्यायचीच नाही असं चालवलं जात आहे. देशात कधीच अशी निलंबनाची कारवाई झाली नव्हती पण आता निलंबन करायचं आणि सरकार चालवायचं ही नवी पद्धत सुरु झाली असल्याचंही हल्लाबोल जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर केला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, राम सर्वांचाच आहे त्यामध्ये अडकू नका. राम आपला नाही असं नाहीये. आपणही रामभक्त आहोत पण त्याच्यात अडकू नका. सरकारमध्ये बसलेल्या लोकांसमोर लोकांच्या उणीवा काय आहेत त्या मांडण्याचं काम करण्याचं आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

दरम्यान, देशावर २०५ लाख कोटींचं कर्ज असून एवढं कर्ज आपल्या डोक्यावर असेल तर आपल्या देशाती अवस्था बांग्लादेश आणि श्रीलंकेसारखी होणार असल्याचंही भाकीत जयंत पाटलांनी केली आहे. तसेच देशात कुटुंब बचतीमध्ये मागील १० वर्षांच सर्वांत निच्चांकी वर्ष सध्याचं असून अर्थव्यवस्थेवर सरकार बोलत नाही, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात