ई-स्प्रिंटोने ‘रॅपो’ आणि ‘रोमी’ इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च केल्या

E-Sprinto launched ‘Rapo’ and ‘Romi’ electric scooters : भारतातील सर्वात वेगाने वाढणारी इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड ई-स्प्रिंटो ने अधिकृतपणे त्यांच्या अत्यंत अपेक्षित रॅपो आणि रोमी इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच केल्या आहेत. या लाँचिंगसह, ई-स्प्रिंटोच्या प्रोडक्ट लाइनअपमध्ये आता १८ व्हेरिएंटच्या ६ मॉडेल्सचा समावेश आहे, जे मजबूत आणि सुलभ गतिशीलता समाधान प्रदान करण्या-या ब्रँडच्या वचनबद्धतेची पुष्टी करते. रोमी आणि रॅपो कॉलेज विद्यार्थी, रोजंदारी (गिग वर्कर्स) आणि शहरी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या असून अनुक्रमे रुपये ५४,९९९ आणि रुपये ६२,९९९ च्या किफायतशीर किमतीत उपलब्ध होतील.

ई-स्प्रिंटोचे सह-संस्थापक आणि संचालक श्री अतुल गुप्ता म्हणाले, “ई-स्प्रिंटोमध्ये आम्ही नेहमीच अशी उत्पादने तयार करण्यावर विश्वास ठेवला आहे ज्या आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजांनूसार प्रतिकृती तयार करतात आणि रॅपो आणि रोमी या तत्त्वज्ञानाचे उदाहरण देतात. या ईव्ही स्कूटर्स सुरक्षा आणि मजबूती या दोन्हीसाठी नवीनतम तंत्रज्ञान एकत्रित करून, उत्कृष्टतेसाठी आमच्या वचनबद्धतेसाठी एक उदाहरण आहेत. पुढे पाहता, आमच्या भविष्यातील योजना आमच्या आतापर्यंतच्या प्रवासाइतक्याच महत्त्वाकांक्षी आहेत. नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करण्यासाठी आणि आमच्या ऑफरमध्ये आणखी विविधता आणण्यासाठी आम्ही सक्रियपणे नवीन क्षितिजांचा शोध घेत आहोत.”

ई-स्प्रिंटो रॅपो: रॅपो स्कुटर लांबी १८४०, रुंदी ७२० आणि उंची ११५० या डाईमेन्शन्सच्या मापासह, १७० मिमी ग्राउंड क्लीयरन्स देऊ करतो. पोर्टेबल ऑटो कटऑफ चार्जरसह सुसज्ज लिथियम / लीड बॅटरी आयपी६५ वॉटरप्रूफ रेटिंगसह २५० डब्ल्यू बीएलडीसी हब मोटरला पॉवर देते. रॅपोची उच्च गती २५ किमी प्रति तास आहे आणि पूर्णपणे चार्ज असल्यावर १०० किमीचे मायलेज कव्हर करते. फ्रंट सस्पेंशन टेलिस्कोपिक हायड्रोलिक असुन आणि रिअर सस्पेंशन कॉइल स्प्रिंग थ्री-स्टेप अॅडजस्टेबल यंत्रणेसह आहे. फ्रंट डिस्क ब्रेक १२ इंच रिम आणि रिअर ड्रम ब्रेक १० इंच मोटर सुरक्षितता सुनिश्चित करते आणि लोडिंग क्षमता १५० किलो ग्रॅम इतकी प्रभावशील आहे.

ई-स्प्रिंटो रोमी: ही इ स्कुटर १८००, रुंदी ७१० आणि उंची ११२० चे वैशिष्ट्यीकृत डाईमेन्शन्स असुन, रॅपोशी समानता दर्शविते. यात १७० मिमी ग्राऊंड क्लिअरन्स देण्यात आले असून पोर्टेबल ऑटो कट ऑफ चार्जरसह लिथियम/लीड बॅटरी देण्यात आली आहे. अभिमानास्पद आयपी65 वॉटरप्रूफ रेटिंग सह, २५० डब्ल्यू बीएलडीसी हब मोटरमूळे रोमी २५ किमी प्रति तासाच्या उच्च गतीपर्यंत जाते आणि पूर्णपणे चार्ज असल्यावर १०० किमी कव्हर करते. या सोबतच, रोमी टेलिस्कोपिक हायड्रोलिक फ्रंट सस्पेंशन आणि कॉइल स्प्रिंग थ्री-स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेंशनसह प्रगत सस्पेंशन प्रणालीने सुसज्ज आहे, जे फ्रंट डिस्क ब्रेकसह पूरक, १५० किलो च्या लोडिंग क्षमतेसह मजबूत आणि अष्टपैलू रायडिंग अनुभव सुनिश्चित करते.

दोन्ही मॉडेल्स अभिमानास्पद वैशिष्यांसह येतात, ज्यात रिमोट लॉक/अनलॉक, रिमोट स्टार्ट, इंजिन किल स्विच/चाइल्ड लॉक/पार्किंग मोड आणि यूएसबी-आधारित मोबाइल चार्जिंगचा समावेश आहे. डिजिटल रंगीत डिस्प्ले बॅटरी स्टेटस, मोटर फेल्युअर, थ्रॉटल फेल्युअर आणि कंट्रोलर फेल्युअर (Digital color display for battery status, motor failure, throttle failure and controller failure)याविषयी रायडर्सना माहिती देते. रॅपो लाल, निळा, राखाडी, काळा आणि पांढरा ह्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, तर रोमी लाल, निळा, राखाडी, काळा आणि पांढरा ह्या रंगांचा पर्याय देऊ करतो.

महत्वाच्या बातम्या-

बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Maratha Reservation: अजित पवारांकडून आमदार, खासदारांना दिल्या गेल्या ‘या’ खास सूचना

२०१९ सालच्या निवडणुकीत ‘या’ दोन उमेदवारांना होता ओव्हर कॉन्फिडन्स; कार्यकर्त्यांची झाली होती मोठी निराशा